पिंपळनेर पोलीसांची धडक कारवाई, २,५९,३७० रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त.

पिंपळनेर ( हरीश जगताप ) दैनिक शब्दगंगा वृत्त सेवा : गुजरात राज्यात अवैधरित्या ओमनी निळया रंगाची गाडी या वाहनातुन विदेशी दारू वाहतुक करणाऱ्यांवर पिंपळनेर पोलीसांची धडक कारवाई
पिंपळनेर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्री. किरण बर्गे यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील गुजरात बॉर्डर वरील ओटाबारी चेकपोस्ट येथे भेट दिली होती त्या दरम्यान मीळालेल्या गोपनीय बातमी नुसार, बसरावळ गावाच्या दिशेने एक निळया रंगाची ओमनी गाडी येतांनी दिसली, वाहन चेक करणेसाठी थांबवुन वाहन तपासणी करता सदर वाहन क्रंमाक एम.एच.४३ आर.६७१ हिचेत विदेशी दारूचे बॉटल व बॉक्स, त्यात मॅकडॉल नंबर वन, गोवा टु ईन वन कंपनीची विदेशी दारू, कॅस्टल व्होडका दारू मिळुन आली आहे. वरील कार्यवाहीत ५९.३७० / – रुपेय किंमतीचे विदेशी दारूचे बॉटल व बॉक्स, त्यात मॅकडॉल नंबर वन, गोवा टु ईन वन कंपनीची विदेशी दारू, कॅस्टल व्होडका दारू, कांगारो प्रिमियम कंपनीची बियर, तसेच २००००० /- रु किं निळया रंगाची ओमनी गाडी क्रंमाक एम. एच. ४३ आर. ६७१ असा मुददेमाल एकुण – २,५९,३७० /- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करणेत आला आहे.सदर कार्यवाही बाबत पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला आहे. आरोपी राहुल सुभाष पवार रा.इंदिरानगर पिंपळनेर ता.साक्री यास गुन्हयाचे कामी ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांनी आगामी विधानसभा निवडुक २०२४ अनुषंगाने दिलेल्या सुचना प्रमाणे तसेच पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे उप विभागीय पोलीस अधिकारी ग्रामिण विभाग साक्री श्री. संजय बांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. किरण बर्गे, भुषण शेवाळे पोलीस उप निरिक्षक, तसेच पोकॉ/ नरेंद्र माळी, पोकॉ/ चेतन गोसावी, पोकॉ/ सोमनाथ पाटील, पोकॉ/ पंकज वाघ, पोना / दत्तु कोळी, पोका / दिपक पवार अशांचा सहभाग आहे पुढील कार्यवाही सुरु आहे.