पिंपळनेर(हरीश जगताप ) दैनिक शब्दगंगा : पिंपळनेर येथील इंदिरानगर वसाहतीत दिनांक ३ / ११ / २०२४ रोजी १२:३० वाजेच्या सुमारास महेंद्र श्रावण बागुल, रोहित महेश बेनुस्कर, राहुल नाना यसाणे हे भांडण करीत होते. त्या वेळी सुरेश भीमराव पवार यांनी रात्र खूप झाली भांडण आरडाओरडा करू नका असे सांगितले असता वरील तिघांनी सुरेश भीमराव पवार यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व तिघांनी सुरेश भीमराव पवार यांना जवळ पडलेले मंडपाचे साहित्य होते महेंद्र श्रायण बागुल याने त्यातील लोखंडी रॉड उचलून सुरेश भीमराव पवार यांच्या डोक्यावर जोराने मारला त्यावेळी ते बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले त्याचवेळी त्यांचा मुलगा राकेश सुरेश पवार याने महेंद्र श्रावण बागुल यांच्या हातातून लोखंडी पाईप हिसकावण्याचा प्रयत्न केला असता त्याला देखील रोहित महेश बेनुस्कर, राहुल नाना यसाणे या तिघांनी मिळून जवळच पडलेल्या कौलाने हाता बुक्यांनी मारहाण करून त्यास गंभीर जखमी केले व आमच्या नादी लागू नका असे सांगत जीवे मारण्याची धमकी देत तिथून निघून गेले सुरेश पवार यांना ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर येथे दाखल केले असता त्यांच्या डोक्याला तेरा टाके पडले असून मुलगा सुरेश यास डोक्यास मुका मार लागलेला आहे त्यावरही उपचार सुरू आहेत सदर मारहाण करणारे विरूद्ध पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे सौ. भारती बाई सुरेश पवार यांनी कायदेशीर तक्रार दाखल केली असून पिंपळनेर पोलीस ठाण्याचे ए. पी.आय. किरण बर्गे यांनी तिनही आरोपींना अटक केली असून पुढील तपास राजेंद्र उत्तम मोरे असिस्टंट सब इंस्पेक्टर हे करीत आहेत.