पिंपळनेर ( हरीश जगताप ) दैनिक शब्दगंगा वृत्त सेवा : गुजरात राज्यात अवैधरित्या ओमनी निळया रंगाची गाडी या वाहनातुन विदेशी दारू वाहतुक करणाऱ्यांवर पिंपळनेर पोलीसांची धडक कारवाई पिंपळनेर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्री. किरण बर्गे यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील गुजरात बॉर्डर वरील ओटाबारी चेकपोस्ट येथे भेट दिली होती त्या दरम्यान मीळालेल्या गोपनीय बातमी नुसार, बसरावळ गावाच्या दिशेने एक निळया रंगाची ...
अमळनेर (ईश्वर महाजन ) दैनिक शब्दगंगा वृत्त सेवा अमळनेर विधानसभा मतदार संघात मोठ्या राजकीय घडामोडी होत असतांना दिसुन येत आहे. अमळनेर तालुक्यामध्ये उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचा जोरदार प्रचार प्रसार सुरू केला आहे. कृषीभूषण माजी आमदार साहेबराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अनिल नथ्थू शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. महा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांबद्दल बरोबर अमळनेर तालुका, पारोळा ...
पिंपळनेर(हरीश जगताप ) दैनिक शब्दगंगा : पिंपळनेर येथील इंदिरानगर वसाहतीत दिनांक ३ / ११ / २०२४ रोजी १२:३० वाजेच्या सुमारास महेंद्र श्रावण बागुल, रोहित महेश बेनुस्कर, राहुल नाना यसाणे हे भांडण करीत होते. त्या वेळी सुरेश भीमराव पवार यांनी रात्र खूप झाली भांडण आरडाओरडा करू नका असे सांगितले असता वरील तिघांनी सुरेश भीमराव पवार यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व ...
पिपळनेर(हरिष जगताप ) दैनिक शब्दगंगा वृत्त सेवा : पुणे येथे Vsvss सोशल फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यात धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील भूमिकन्या, वक्तृत्वाची हिरकणी म्हणून ओळख असलेली कुमारी रुपाली कन्हैयालाल चौधरी हीचे सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या महत्वपूर्ण कामगिरीबद्दल राज्यस्तरीय महाराष्ट्र ...
रांची (दै. शब्दगंगा वृत्त सेवा) : सोरेन सरकार नक्षलवाद्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप करून शाह म्हणाले की, जेएमएमने नक्षलवादाला पाठिंबा दिला, तर केंद्रातील भाजप सरकारने ते संपवले.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी झारखंडमधील पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील ढलभूमगड येथील घाटशिला येथे सभेला संबोधित केले. यादरम्यान शाह यांनी हेमंत सोरेन यांच्या राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आणि घुसखोरांना आदिवासी जमिनी दिल्याचा आरोप ...
धुळे (राजेंद्र सोनार) दै. शब्दगंगा वृत्त सेवा : धुळे येथे महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल यांनी आज जिटीपी चौक ते दत्तमंदिर चौक परिसरात,दुकानदार,भाजीविक्रेते, चारचाकी गाडी चालक व मालक यांच्या गाठी भेटी घेतल्या. भाजी विक्रेत्यांना सांगितले की मनपा आपल्यासाठी मोठी भाजी मंडई बांधत असून तेथे आपणास हक्काचा गाळा मिळेल रस्त्यावर बसायची गरज राहणार नाही. यावेळी त्यांच्या सोबत संजय बोरसे, व्यंगचित्रकार राजेंद्र सोनार, ...
शिरपूर(मनोज भावसार ) दैनिक शब्दगंगा वृत्त सेवा : शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर.सी.पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चच्या प्राध्यापिका रुकैय्या ताहेर गिरासे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा अंतर्गत औषधनिर्माणशास्त्र या विषयात पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली.इन-सिलिको अँड इन – व्हिट्रो इव्हॅल्युएशन ऑफ केमिकल स्कॅफोल्ड्स टारगेटिंग द मेकानिसम कॉन्फफेरींग के मोथेरोपि ...
पुणे (राहुल जाधव) दैनिक शब्दगंगा वृत्त सेवा: दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(एसपी)सुप्रिमो शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी आयोजित करण्यात आला आहे, जिथे कुटुंबातील सदस्य, पक्षाचे पदाधिकारी आणि विरोधी पक्षातील दिग्गजांचे मित्र गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीच्या काळात एकत्र येत आहेत.दुसरा कार्यक्रम अजित पवार यांच्या बारामतीतील काटेवाडी या मूळ गावी असलेल्या फार्म हाऊसवर होणार आहे. याबाबत अजित पवार यांनी शुक्रवारी एक्सवर ...
शिंदखेडा(संजयकुमार महाजन) दैनिक शब्दगंगा वृत्त सेवा : कार्तिक अमावस्येला भगवान महावीरांचे महापरिनिर्वाण झाले. हा दिवस महावीरांच्या साधनाकालचा सर्वोपरी दिवस समजला जातो. येथील जैन स्थानकात समरथगच्छाधिपती उत्तम गुरू यांच्या शिष्यांच्या चातुर्मास सुरु आहे. या दिनानिमित्त विशेष प्रवचनात पुज्य चंदनबालाजी महाराज म्हणाल्या, भगवान महावीरांच्या निर्वाण दिनाला ज्योतीपर्व, प्रकाशपर्व, लक्ष्मीपर्व ही म्हणतात. निर्वाण म्हणजे अखंड शांती मध्ये विलिन होणे,सर्व दुःख व विकारापासून मुक्त ...
शिंदखेडा(संजयकुमार महाजन) दै. शब्दगंगा वृत्त सेवा : शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व शेल्टी येथील रहिवासी श्री. शिवाजीराव मोतिराम पाटील यांना ससदे शिवारातील शेतावर विषारी सापाने दंश केल्याने त्यांचे नाशिक येथील सुयोग हॉस्पीटल येथे उपचार सुरू होते. २५ ऑक्टोबर रोजी सर्पदंश झाला होता. गेल्या चार दिवसांपासून ते मृत्युशी झुंज देत होते अखेर २८ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांचे उपचारादरम्यान दुःखद ...